Monday, December 19, 2011

अशी असावी ती..

दिवस तिचा माझ्या शिवाय सरु नये..
सकाळ दुपार संध्याकाळ माझ्याशिवाय कोणी दिसू नये..
माझ्याकरता तिने वेड वेड व्हाव..
स्वप्नात जरी भेटलो मी मला घट्ट बिल्गाव..

माझ्याकडे हट्टाचा पाढा तिने वाचावा..
मी विसरलो तर huhh.. म्हणून reply मला पाठवावा..
लाड करून घेण्याचा तिला वाटावा हेवा..
म्हणाव कसा जमत् रे तुला माझ्या राजा..

कधी मी विसरलो काही तर हलकेच तिने रागवावे..
जा तू.. बोलू नको.. म्हणून रागाला स्वरुप द्यावे..
त्या नंतरच्या मनवन्याने मन तिच भरून याव..
असा कसा रे तू असा मनातच म्हणाव..

अडचणीत असताना मला तिने पहिले आठवावे..
मी पण सगळा सोडून तिच्याकडे धावावे..
वागणं असाव मनमोकळ तिच माझ्यासोबत..
अश्रूंना करून द्यावी तिने वाट तिच्या राजासोबत..

बाहेर फिरताना घट्ट हात तिने धरावा.. 
सख्या मला सोडू नकोस असा अट्टहास तिचा असावा..
माझ्यासोबत असताना मनात एक वेगळीच भावना असावी..
तुझ्याशिवाय मी नाही अन् माझ्याशिवाय तू अशी दृढ भावना रुजावी..

मनातल्या मधु सखी सारखा तिने रहाव..
प्रिन्सेस चा सुख माझ्याकडून तिला मिळाव..
छकूली प्रमाणे मी तिच्या वर प्रेम कराव..
सर्वात जवळचा मित्र म्हणून स्थान माझ असाव..
 
माझी अन् फक्त माझीच प्रिया ती असावी..
तिचा अन् फक्त तिचाच वेडू मी व्हाव..
-- अभी

No comments:

Post a Comment