Tuesday, December 20, 2011

तुझी तू..

अनपेक्षित पणे येणारा तुझा कॉल..
अन् कॉलनंतर येणारी तुझी अपेक्षित आठवण..
नकळत पणे तुझ भेटणं..
कधी कधी कळूनही भेटता येणं..
नावडती असली गोष्ट तरी तुझ ते करणं..
अचानकच परी होऊन तुझ ते नटणं..
लाडात येऊन कधीतरी तुझ ते अनोखा हट्ट करणं..
रागऊून तुझ ते प्रेमहुनही गोड असा नाक मुरडणं..
रागवता तुझ्या डोळ्यात येणारे पाणी..
हसत असताना निसर्गही गातो तुझ्यासोबत आनंद-गाणी..
लाजरं-गोजर ते तुझ वावरणं..
जसा काही जीवनाच्या नक्षीदार रांगोळित रंग भरणं..
कष्टातही शोधतेस यशाची वाट..
आनंदाने खेळतेस जीवनाचा सारीपाट..
गैरसोयीची गोष्ट सुद्धा सोयीची करून घेण्याची तुझी कला..
खर सांगू..
सगळ्यांहून अशी विविध-अंगी तू खूप भावतेस मला..
-अभी

No comments:

Post a Comment