नाजूक हात पकडून तिचा, Heartshape टेबलावर बसवला होता..
टेबलावर होता एक flowerpot..
त्यात पिंक कलरचे गुलाब आठ..
त्या गुलाबात मध्यभागी होती १ लाल कळी..
जशी काही तिच्या गोऱ्या गालावरील सुंदर खळी..
रूम मध्ये दरवळत होता गुलाबाचा गंध..
romantic संगीत करत होते वातावरण मुग्ध..
लाल गुलाब केला मी तिला सप्रेम भेट..
प्रेमाचा बाण माझा लागला होता तिच्या हृदयावर थेट..
इच्छा होती तिच्या हातानेच लिहाव तिने माझ्या हृदयावर तिचा नाव..
इतक्यात सकाळचा गजर वाजला अन गुलाबी स्वप्नं संपला ना राव..
- अभी

No comments:
Post a Comment