माझ्या सावलीत आज..
तुझी रंगीत छटा दिसली ..
तू माझी नसून सुद्धा..
त्या क्षणी माझीच वाटली.. l१ l
तुझी रंगीत छटा दिसली ..
तू माझी नसून सुद्धा..
त्या क्षणी माझीच वाटली.. l१ l
रुसली होतीस तू..
चेहऱ्यावरचा नूर हि हरवला होता..
भांडलो होतो आपण म्हणून..
ऐन पौर्णिमेला चंद्र लपला होता.. l२ l
आकाशातला एक थेंब तुझ्यावर पडला..
स्पर्शाने तुझ्या सुखावून तुझ्यातच सामावला..
त्याला तुझ्यात विलीन होताना पाहून..
माझा जीव मनातच जळला.. l३ l
चंद्र-सूर्य-तारे सगळे आकाशाशी एकलग..
कधी होणार नाही ते एकमेकांहून विलग..
आवडतेस तू मला सगळ्यांहून अलग..
मनापासून विचारतोय होशील का गं माझी जिवलग..l४ l
-अभी
आवडतेस तू मला सगळ्यांहून अलग..
मनापासून विचारतोय होशील का गं माझी जिवलग..l४ l
-अभी

No comments:
Post a Comment